CBSE Class 12 Marathi Sample Paper 2026 27 with Solutions PDF Download

Download CBSE Class 12 Marathi Sample Papers

Access comprehensive sample question papers for Class 12 Marathi using the CBSE Class 12 Marathi Sample Paper 2026 27 with Solutions PDF Download. Designed to align with the 2026-27 CBSE academic guidelines, these model papers help students assess their exam readiness and understand current marking schemes.

Access CBSE Sample Papers and Solutions

Navigate directly to the solved Marathi model papers using the digital viewer below. Each practice set includes detailed solutions, allowing students to instantly cross-check their work and identify areas requiring further revision.

1) पुढील परिच्छेद लक्षपूर्वक वाचा आणि त्याआधारे विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा.(CBQ)

आपण शिक्षण पद्धतीवर मनसोक्त टीका करतो, वाचतो, ऐकतो; पण तरीही आपली सगळी तडफड त्याच शिक्षणप्रणालीतील ठराविक अभ्यासक्रम पूर्ण करणे यासाठी चालते. नंतरचे आयुष्य, त्यात समोर येणारी परिस्थिती आणि आपल्याला मिळणारे शिक्षण यांची सांगड खूपच कमी असते. त्यात स्वतःची आवड, क्षमता आणि विद्यापीठाचे शिक्षण यांचीही परस्परसंगत जमली नाही, तर नक्कीच आयुष्यभर पदोपदी ठेचा लागण्याचा संभव असतो.
एखादी विद्याशाखा अभ्यासाला निवडणे, त्यात पारंगत होणे आणि त्या विद्याशाखेत व्यवसाय करणे, नोकरी करणे यात खूपच फरक आहे. प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणचे वातावरण व परिस्थिती याचा आधी कधीच अनुभव नसतो आणि मग कामाच्या ठिकाणी कंटाळा, निराशा, न्यूनगंड जाणवू लागतो.
स्वतःच्या क्षमतांचा दहावी-बारावीत नीट अंदाज येत नाही. सभोवतालचे अभ्यासाचे वातावरण व दडपण, परीक्षेचा ठराविकपणा व त्यांना अनुसरून क्लासेसमधून मिळालेले प्रशिक्षण यांचाच आपल्या कामगिरीमध्ये जास्त वाटा असेल, तर दहावी, बारावीचे यश नंतर टिकवणे खूप अवघड जाते आणि त्यातून न्यूनगंड, निराशा, समाजाबद्दलची एक उगीचच चीड मनामध्ये भरून राहू शकते.
या चक्रातून सुटकेचा काही मार्ग आहे का? मला वाटते आहे आणि तो म्हणजे जीवनाकडे बघण्याचा एक सकारात्मक दृष्टिकोन. असा एखादा विषय शोधून काढा की ज्यात तुम्हाला फक्त काम यशस्वी झाल्यावरच नाही, तर प्रत्यक्ष काम चालू असतानाही आनंद वाटेल; आव्हान वाटेल. मग ती एखादी शस्त्रक्रिया असो, शिकवणे असो, गणित असो किंवा माहितीचे अन्वयार्थ लावणे असो. असे काही कलाकार असतात की त्या चित्राच्या, शिल्पाच्या किंवा कवितेच्या निर्मितीमध्ये त्यांना पराकोटीचे समाधान लाभते. नंतर त्यांच्या कृतीचे कौतुक कसे होते किंवा कौतुक होत नाही, याबद्दल त्यांना काही सोयरसुतक नसते. सध्याच्या जगात याला व्यावसायिक समाधान म्हणतात की, जे पगार, प्रतिष्ठा, सुरक्षितता या सर्वांच्या पलीकडील काहीतरी असते. आपल्या आवडीच्या विषयातच आपल्या चौकस बुद्धीला आणि प्रतिभाशक्तीला वाव मिळू शकतो; म्हणून पैसा, प्रतिष्ठा मिळवून देणाऱ्या पदव्यांपेक्षा आपल्या आवडत्या विषयातील पदवी व त्यांच्या संगतीतील काम यांची निवड करा.
ज्या क्षेत्रात तुमच्यातील अनेक सुप्त गुणांच्या प्रकटीकरणाला वाव आहे आणि त्यात तुमच्या स्वतंत्र वृत्तीला व माणूसपणाला वाव आहे अशी काही क्षेत्रे मी सुचवू शकेन. शिक्षण, प्रसारमाध्यमे आणि प्रशासन (सरकारी यंत्रणा, पोलीस इत्यादी) यामध्ये चांगल्या कामात आनंद घेणाऱ्या व स्वतःच्या आवडीने येणाऱ्या माणसांची खूप गरज आहे. या क्षेत्रांसाठी तुमची पदवी कोणत्याही विषयातली चालते. तसेच तुमच्या मनातील सामाजिक जाणिवेलाही या क्षेत्रात खूप संधी मिळू शकते. शास्त्र-तंत्रज्ञान क्षेत्रामध्येही समुचित तंत्रज्ञान, ते लोकांपर्यंत पोहोचवणे आणि रोजगार निर्मिती.... या दृष्टीने स्वतःचे असे छोटे-छोटे; पण स्वतंत्र उपक्रम चालवावेत.
आयुष्याच्या वाटचालीत चाकोरी-पैसा-प्रतिष्ठा यापेक्षा नावीन्य-आवडते कार्यक्षेत्र-मित्रपरिवार यांची साथ जास्त विश्वासार्ह व मोलाची, समाधानकारक असणार हे समजून निर्णय घेऊया.

 

1.A) खालील प्रश्नांची उत्तरे योग्य पर्याय निवडून लिहा. [3 Marks]

 

I] अभ्यासक्रम निवडताना स्वत:ची क्षमता, आणि विद्यापीठाचे शिक्षण यांची संगत जमली नाही तर ...... [1 Mark]
a) आनंद होईल
b) जीवनात यश मिळेल
c) पदोपदी ठेचा लागतील
d) नोकरी व व्यवसायात यश मिळेल

Answer: c) पदोपदी ठेचा लागतील

Teacher's Note:
a) परिच्छेदाच्या पहिल्या भागातील मुख्य विधान लक्षात घ्यावे.
b) उत्तर देताना परिच्छेदातील नेमके शब्द ओळखावेत.

 

II] कोणत्या क्षेत्रासाठी कुठल्याही विषयातील पदवी चालते? [1 Mark]
a) वैद्यकीय
b) अभियांत्रिकी
c) सरकारी यंत्रणा व पोलीस
d) वैज्ञानिक

Answer: c) सरकारी यंत्रणा व पोलीस

Teacher's Note:
a) शिक्षण, प्रसारमाध्यमे व प्रशासन या क्षेत्रांचा उल्लेख परिच्छेदात आहे हे लक्षात ठेवावे.
b) पर्यायांतील शब्द परिच्छेदाशी जुळवून पाहावेत.

 

III] 'पारंगत' या शब्दाचा समानार्थी शब्द आहे ... [1 Mark]
a) परंपरा
b) निष्णात
c) अभ्यास
d) पदवी

Answer: b) निष्णात

Teacher's Note:
a) 'पारंगत' म्हणजे एखाद्या विषयात पूर्ण कुशल असणे हे लक्षात ठेवावे.
b) समानार्थी शब्द ओळखताना मूळ शब्दाचा नेमका अर्थ पाहावा.

 

1.B) पुढील प्रश्नांची 15 / 20 शब्दांत उत्तरे लिहा. [4 Marks]

 

I] अभ्यासाची कोणकोणती क्षेत्रे लेखकाने सुचवलेली आहेत? [2 Marks]

Answer: शिक्षण, प्रसारमाध्यमे, प्रशासन (सरकारी यंत्रणा व पोलीस) आणि शास्त्र-तंत्रज्ञान ही क्षेत्रे लेखकाने सुचवली असून यामध्ये स्वतंत्र, छोटे उपक्रम चालवता येतात.

Teacher's Note:
a) परिच्छेदातील क्षेत्रांची यादी क्रमाने आठवावी.
b) उत्तर दिलेल्या शब्दमर्यादेत बसवावे.

[CHECK: Q1.B - प्रश्नपत्रिकेत शब्दमर्यादा 15/20 शब्द दिली आहे, तर उत्तरपत्रिकेत 30/35 शब्द नमूद आहे.]

 

II] अभ्यासक्रम निवडीच्या गोंधळाच्या चक्रातून सुटण्यासाठी लेखकाने कोणता मार्ग सांगितला? [2 Marks]

Answer: जीवनाकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टिकोन ठेवून स्वतःच्या आवडीचा विषय शोधून काढावा, असा मार्ग लेखकाने सांगितला आहे.

Teacher's Note:
a) 'सकारात्मक दृष्टिकोन' हा मुख्य मुद्दा उत्तरात यायला हवा.
b) आवडीचा विषय निवडणे हा उपाय स्पष्ट करावा.

 

1.C) पुढील प्रश्नाचे उत्तर सुमारे 40 / 45 शब्दांत लिहा. [3 Marks]

 

I] विद्याशाखा निवडताना होणारा गोंधळ लेखकाने कसा मांडला आहे? [3 Marks]

Answer: स्वतःच्या क्षमतांचा दहावी-बारावीत नीट अंदाज न येणे, सभोवतालचे अभ्यासाचे वातावरण व दडपण, परीक्षेचा ठराविकपणा आणि क्लासेसमधून मिळालेले प्रशिक्षण यांचा कामगिरीत जास्त वाटा असल्याने विद्याशाखा निवडताना गोंधळ होतो, आणि यश नंतर टिकवणेही खूप अवघड जाते, असे लेखकाने मांडले आहे.

Teacher's Note:
a) उत्तरात दडपण, ठराविकपणा व प्रशिक्षण हे तीन मुद्दे स्पष्ट यायला हवेत.
b) शब्दमर्यादा पाळणे आवश्यक आहे.

 

2 : खालील कविता वाचून त्याखाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दांत लिहा. (CBQ)

बाळ, चाललास रणा
घरा बांधिते तोरण
पंचप्राणांच्या ज्योतींनी
तुज करिते औक्षण.
याच विक्रमी बाहूंनी
स्वतंत्रता राखायची,
खांद्यावरी या विसावे
शांती उद्याच्या जगाची.
म्हणूनिया माझ्या डोळा
नाही थेंबही दुःखाचा;
मीही महाराष्ट्रकन्या
धर्म जाणते वीराचा.
नाही एकही हुंदका
मुखावाटे काढणार.
मीच लावुनी ठेवली
तुझ्या तलवारीला धार.
अशुभाची सावलीही
नाही पडणार येथे;
अरे मीही सांगते ना
जिजा-लक्ष्मीशी नाते.
तुझ्या शस्त्रांना, अस्त्रांना
शक्ती देईल भवानी,
शिवरायांचे स्वरूप
आठवावे रणांगणी.
धन्य करी माझी कूस
येई विजयी होऊन,
पुन्हा माझिया हाताने
दूधभात भरवीन!
- पद्मा गोळे

 

2.A) खालील प्रश्नांची उत्तरे दिलेल्या पर्यायामधून निवडून लिहा. [2 Marks]

 

I] आई बाळाचे कशाने औक्षण करते? [1 Mark]
a) दिव्यांनी
b) पंचप्राणांच्या ज्योतींनी
c) सोन्या-चांदींनी
d) फुलांच्या ताटाने

Answer: b) पंचप्राणांच्या ज्योतींनी

Teacher's Note:
a) कवितेच्या पहिल्या कडव्यातील शब्द लक्षात ठेवावा.
b) 'औक्षण' या शब्दाशी संबंधित ओळ शोधावी.

 

II] महाराष्ट्रकन्या कोणाचा धर्म जाणते? [1 Mark]
a) वीराचा
b) मानवतेचा
c) शौर्याचा
d) महाराष्ट्राचा

Answer: a) वीराचा

Teacher's Note:
a) 'मीही महाराष्ट्रकन्या धर्म जाणते वीराचा' ही ओळ आधार आहे.
b) पर्यायांतील समान शब्दांत गोंधळू नये.

 

2.B) खालील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा. [3 Marks]

 

I] रणांगणी कोणाचे रूप आठवावे? [1 Mark]

Answer: रणांगणी शिवरायांचे स्वरूप आठवावे.

Teacher's Note:
a) उत्तर एका पूर्ण वाक्यात लिहावे.
b) 'शिवरायांचे स्वरूप' हा नेमका शब्द वापरावा.

 

II] आई आपले नाते कोणाशी सांगते? [1 Mark]

Answer: आई आपले नाते जिजाबाई आणि राणी लक्ष्मीबाईशी सांगते.

Teacher's Note:
a) 'जिजा-लक्ष्मीशी नाते' या ओळीचा संदर्भ घ्यावा.
b) दोन्ही नावे उत्तरात यायला हवीत.

 

III] बाळाच्या तलवारीला कोणी धार लावून ठेवली आहे? [1 Mark]

Answer: बाळाच्या तलवारीला स्वतः आईने धार लावून ठेवली आहे.

Teacher's Note:
a) 'मीच लावुनी ठेवली तुझ्या तलवारीला धार' ही ओळ आधार आहे.
b) उत्तर पूर्ण वाक्यात लिहावे.

 

3. खालीलपैकी कोणत्याही एका विषयावर 300 ते 325 शब्दांत निबंध लिहा. (आवश्यकता वाटल्यास दिलेल्या मुद्द्यांचा आधार घ्यावा.) [10 Marks]
I) पर्यावरण संवर्धन काळाची गरज -
मुद्दे:- (पर्यावरण म्हणजे पृथ्वीवरील जीवनाचा आधार.... प्रदूषण (वायू, जल, ध्वनी, माती) याचे परिणाम...... वृक्षतोड, औद्योगिकीकरण आणि वाहतूक यामुळे वाढलेले प्रदूषण....जैवविविधता, प्राणी व वन्यजीवनावर होणारा परिणाम....स्वच्छता आणि कचरा व्यवस्थापनाचे महत्त्व.…..पर्यावरण संवर्धनासाठी उपाय - वृक्षारोपण, सार्वजनिक वाहतूक, प्लास्टिक टाळणे..इ.)
II) शेतकऱ्याचे मनोगत -
मुद्दे :- (माझी ओळख ….मी अन्नदाता….शेती हीच माझी उपजीविका आणि अभिमान…. माझे दैनंदिन श्रम…निसर्गाशी नाते…..निसर्गावरच माझ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह अवलंबून….पिकाशी नाते….अडचणी आणि संघर्ष….. माझ्या मनातील हळहळ….. माझे समाधान…..माझी अपेक्षा इ.)
III) मोबाईल आणि युवक -
मुद्दे:- (मोबाईलचे फायदे - संपर्क साधणे, शिक्षण, माहिती मिळवणे……त्रासदायक परिणाम - व्यसन, झोपेची समस्या, अभ्यासावर परिणाम….सोशल मीडिया आणि मानसिक आरोग्यावर परिणाम….. वेळेचे नियोजन, मर्यादित वापर…..पालक व शिक्षकांची जबाबदारी….. फायदे आणि तोटे समजून संतुलित वापर आवश्यक…इ.)
IV) पुस्तके बोलू लागली तर…
मुद्दे :- (वाचनाचा अनोखा अनुभव…… ज्ञान मिळण्याची नवी पद्धत……चुकांवर तत्काळ मार्गदर्शन……ग्रंथालयात जादुई वातावरण……. पुस्तके आपल्याला शिकवतील, फक्त ज्ञानच नाही तर संस्कारही…... मजा आणि मैत्री……पुस्तकांचे परस्पर संवाद…..पुस्तके न वाचणाऱ्यांवर पुस्तके रागावतील..…… तुटलेल्या किंवा हरवलेल्या पुस्तकांचा आक्रोश……वाचन संस्कृतीत क्रांती इ.)

Answer: पर्यावरण संवर्धन काळाची गरज

पर्यावरण म्हणजे आपल्या सभोवतालची सृष्टी, जी पृथ्वीवरील सर्व सजीवांच्या जीवनाचा मूळ आधार आहे. हवा, पाणी, माती, वनस्पती आणि प्राणी यांचा समावेश असलेली ही निसर्गव्यवस्था मानवी अस्तित्वासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. परंतु आज औद्योगिकीकरण, वाढती लोकसंख्या आणि वाहतुकीच्या वाढत्या साधनांमुळे पर्यावरणाचा समतोल ढासळत चालला आहे.

वायू प्रदूषण, जल प्रदूषण, ध्वनी प्रदूषण आणि माती प्रदूषण यांसारख्या समस्यांनी आज संपूर्ण जग ग्रासले आहे. कारखान्यांतून बाहेर पडणारा विषारी धूर आणि वाहनांमधून निघणारा कार्बन डायऑक्साइड यामुळे हवेचा दर्जा खालावत चालला आहे. नद्या-तलावांमध्ये सोडले जाणारे रासायनिक सांडपाणी जलचरांच्या जीवावर बेतत आहे. सतत वाढणाऱ्या वृक्षतोडीमुळे जंगले नष्ट होत असून त्याचा थेट परिणाम पर्जन्यमानावर आणि जैवविविधतेवर होत आहे. अनेक वन्यप्राणी व पक्षी नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.

स्वच्छता आणि कचरा व्यवस्थापन हेही पर्यावरण संवर्धनाचे महत्त्वाचे अंग आहे. प्लास्टिकसारख्या न कुजणाऱ्या पदार्थांमुळे जमीन आणि पाणी दोन्ही दूषित होत आहेत. यावर उपाय म्हणून कचऱ्याचे योग्य वर्गीकरण आणि पुनर्वापर करणे आवश्यक आहे.

पर्यावरण संवर्धनासाठी अनेक उपाय करता येतील. सर्वप्रथम, मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करून जंगलांचे क्षेत्र वाढवले पाहिजे. सार्वजनिक वाहतुकीचा वापर वाढवून वैयक्तिक वाहनांचा वापर कमी केल्यास प्रदूषण घटेल. प्लास्टिकच्या पिशव्यांऐवजी कापडी पिशव्यांचा वापर करावा. पाण्याचा काटकसरीने वापर करणे आणि सौरऊर्जेसारख्या अपारंपरिक ऊर्जास्रोतांचा वापर वाढवणे हेही महत्त्वाचे आहे.

शालेय विद्यार्थ्यांपासून ते सरकारपर्यंत सर्वांनी एकत्र येऊन पर्यावरण रक्षणासाठी प्रयत्न केले पाहिजेत. प्रत्येकाने आपल्या परीने एक तरी झाड लावले आणि जपले, तरी भविष्यातील पिढ्यांसाठी स्वच्छ आणि सुंदर पृथ्वी मागे ठेवता येईल. निसर्गाशी मैत्री जपली तरच मानवजातीचे भविष्य सुरक्षित राहील, म्हणून आजच निर्धार करून कृती करणे ही काळाची गरज आहे.

Teacher's Note:
a) निबंधाची सुरुवात, मुख्य मुद्दे व समारोप स्पष्ट व क्रमवार असावेत.
b) दिलेल्या मुद्द्यांचा उपयोग करून स्वतःच्या भाषेत परिच्छेद रचावेत.
c) शब्दमर्यादा (300-325 शब्द) व भाषाशुद्धी यांकडे विशेष लक्ष द्यावे.

 

4. खालीलपैकी कोणत्याही एका विषयावर पत्र लिहा. (लिफाफा आवश्यक) [5 Marks]

तुम्ही निखिल/निकिता राजेंद्र माने, साई निवास, पंचवटी, नाशिक, 422004 असून तुमच्या भागात घंटागाडी नियमित येत नसल्याकारणाने महापालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्याकडे तक्रार करणारे पत्र लिहा. [5 Marks]

Answer:
साई निवास, पंचवटी,
नाशिक - 422004
दिनांक: 15 मार्च 2026

प्रति,
आरोग्य अधिकारी,
नाशिक महानगरपालिका,
नाशिक.

विषय: घंटागाडी नियमित न येण्याबाबत तक्रार.

महोदय,

मी निखिल/निकिता राजेंद्र माने, साई निवास, पंचवटी, नाशिक येथील रहिवासी आहे. आपणास सविनय कळवू इच्छितो/इच्छिते की, गेल्या काही दिवसांपासून आमच्या भागात घंटागाडी नियमितपणे येत नाही. यामुळे परिसरात कचऱ्याचे ढीग साचून दुर्गंधी पसरत आहे. डास व माश्यांचे प्रमाण वाढल्याने संसर्गजन्य आजारांचा धोका निर्माण झाला असून लहान मुले व वृद्धांना याचा मोठा त्रास होत आहे.
तरी आपण याकडे तातडीने लक्ष घालून आमच्या भागात घंटागाडी नियमितपणे पाठवण्याची व्यवस्था करावी, ही नम्र विनंती.

आपला विश्वासू,
निखिल/निकिता राजेंद्र माने

Teacher's Note:
a) प्रेषकाचा पत्ता, दिनांक, विषय व मायना हे घटक अचूक असावेत.
b) तक्रारीचे कारण व परिणाम स्पष्ट शब्दांत मांडावेत.
c) पत्राच्या शेवटी स्वाक्षरी व लिफाफ्याचा उल्लेख आवश्यक आहे.

किंवा

वेदांत/वेदिका देशमुख, उन्नती विद्यालय, कोल्हापूर येथून ग्रंथपाल या नात्याने ग्रंथालयासाठी मराठी कथा, कादंबरी व इतर पुस्तकांची मागणी करणारे पत्र आदर्श बुक स्टोअर्स, पुणे 400011 च्या व्यवस्थापकास लिहा. [5 Marks]

Answer:
उन्नती विद्यालय,
कोल्हापूर.
दिनांक: 15 मार्च 2026

प्रति,
व्यवस्थापक,
आदर्श बुक स्टोअर्स,
पुणे - 400011.

विषय: ग्रंथालयासाठी मराठी पुस्तकांची मागणी.

महोदय,

मी वेदांत/वेदिका देशमुख, उन्नती विद्यालय, कोल्हापूर येथील ग्रंथपाल आहे. आमच्या शाळेच्या ग्रंथालयासाठी मराठी कथा, कादंबरी व इतर वाचनीय पुस्तके खरेदी करावयाची आहेत.
तरी आपल्याकडे उपलब्ध असलेल्या नामांकित मराठी लेखकांच्या कथासंग्रह, कादंबऱ्या तसेच इतर उपयुक्त पुस्तकांची यादी व किंमत सूची आम्हांला पाठवावी, ही विनंती. पुस्तके शक्य तितक्या लवकर पाठवल्यास विद्यार्थ्यांना वाचनासाठी उपलब्ध करून देता येतील.

आपला विश्वासू,
वेदांत/वेदिका देशमुख
ग्रंथपाल, उन्नती विद्यालय, कोल्हापूर

Teacher's Note:
a) मागणीपत्रात आवश्यक पुस्तकांचा प्रकार स्पष्ट नमूद करावा.
b) व्यावसायिक पत्राची भाषाशैली औपचारिक व नम्र असावी.
c) पत्त्याची अचूकता व लिफाफ्याचा उल्लेख विसरू नये.

 

विभाग : A : वाचन व आकलन (15)

 

प्रश्न 1) पुढील परिच्छेद लक्षपूर्वक वाचा आणि त्याआधारे विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. (CBQ)

आपण शिक्षण पद्धतीवर मनसोक्त टीका करतो, वाचतो, ऐकतो; पण तरीही आपली सगळी तडफड त्याच शिक्षणप्रणालीतील ठरावीक अभ्यासक्रम पूर्ण करणे यासाठी चालते. नंतरचे आयुष्य, त्यात सामोरी येणारी परिस्थिती आणि आपल्याला मिळणारे शिक्षण यांची सांगड खूपच कमी असते. त्यात स्वतःची आवड, क्षमता आणि विद्यापीठाचे शिक्षण यांचीही परस्परसंगत जमली नाही, तर नक्कीच आयुष्यभर पदोपदी ठेचा लागण्याचा संभव असतो.
एखादी विद्याशाखा अभ्यासाला निवडणे, त्यात पारंगत होणे आणि त्या विद्याशाखेत व्यवसाय करणे, नोकरी करणे यात खूपच फरक आहे. प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणचे वातावरण व परिस्थिती याचा आधी कधीच अनुभव नसतो आणि मग कामाच्या ठिकाणी कंटाळा, निराशा, न्यूनगंड जाणवू लागतो.
स्वतःच्या क्षमतांचा दहावी-बारावीत नीट अंदाज येत नाही. सभोवतालचे अभ्यासाचे वातावरण व दडपण, परीक्षेचा ठरावीकपणा व त्यांना अनुसरून क्लासेसमधून मिळालेले प्रशिक्षण यांचाच आपल्या कामगिरीमध्ये जास्त वाटा असेल, तर दहावी, बारावीचे यश नंतर टिकवणे खूप अवघड जाते आणि त्यातून न्यूनगंड, निराशा, समाजाबद्दलची एक उगीचच चीड मनामध्ये भरून राहू शकते.
या चक्रातून सुटकेचा काही मार्ग आहे का? मला वाटते आहे आणि तो म्हणजे जीवनाकडे बघण्याचा एक सकारात्मक दृष्टिकोन. असा एखादा विषय शोधून काढा की ज्यात तुम्हाला फक्त काम यशस्वी झाल्यावरच नाही, तर प्रत्यक्ष काम चालू असतानाही आनंद वाटेल; आव्हान वाटेल. मग ती एखादी शस्त्रक्रिया असो, शिकवणे असो, गणित असो किंवा माहितीचे अन्वयार्थ लावणे असो. असे काही कलाकार असतात की त्या चित्राच्या, शिल्पाच्या किंवा कवितेच्या निर्मितीमध्ये त्यांना पराकोटीचे समाधान लाभते. नंतर त्यांच्या कृतीचे कौतुक कसे होते किंवा कौतुक होत नाही, याबद्दल त्यांना काही सोयरसुतक नसते. सध्याच्या जगात याला व्यावसायिक समाधान म्हणतात की, जे पगार, प्रतिष्ठा, सुरक्षितता या सर्वांच्या पलीकडील काहीतरी असते. आपल्या आवडीच्या विषयातच आपल्या चौकस बुद्धीला आणि प्रतिभाशक्तीला वाव मिळू शकतो; म्हणून पैसा, प्रतिष्ठा मिळवून देणाऱ्या पदव्यांपेक्षा आपल्या आवडत्या विषयातील पदवी व त्यांच्या संगतीतील काम यांची निवड करा.
ज्या क्षेत्रात तुमच्यातील अनेक सुप्त गुणांच्या प्रकटीकरणाला वाव आहे आणि त्यात तुमच्या स्वतंत्र वृत्तीला व माणूसपणाला वाव आहे अशी काही क्षेत्रे मी सुचवू शकेन. शिक्षण, प्रसारमाध्यमे आणि प्रशासन (सरकारी यंत्रणा, पोलीस इत्यादी) यामध्ये चांगल्या कामात आनंद घेणाऱ्या व स्वतःच्या आवडीने येणाऱ्या माणसांची खूप गरज आहे. या क्षेत्रांसाठी तुमची पदवी कोणत्याही विषयातली चालते. तसेच तुमच्या मनातील सामाजिक जाणिवेलाही या क्षेत्रात खूप संधी मिळू शकते. शास्त्र-तंत्रज्ञान क्षेत्रामध्येही समुचित तंत्रज्ञान, ते लोकांपर्यंत पोहोचवणे आणि रोजगार निर्मिती.... या दृष्टीने स्वतःचे असे छोटे-छोटे; पण स्वतंत्र उपक्रम चालवावेत.
आयुष्याच्या वाटचालीत चाकोरी-पैसा-प्रतिष्ठा यापेक्षा नाविन्य-आवडते कार्यक्षेत्र-मित्रपरिवार यांची साथ जास्त विश्वासार्ह व मोलाची, समाधानकारक असणार हे समजून निर्णय घेऊया.

 

प्रश्न 1.A) खालील प्रश्नांची उत्तरे योग्य पर्याय निवडून लिहा. [3 Marks]

 

I] अभ्यासक्रम निवडताना स्वत:ची क्षमता, आणि विद्यापीठाचे शिक्षण यांची संगत जमली नाही तर ...... [1 Mark]
a) आनंद होईल
b) जीवनात यश मिळेल
c) पदोपदी ठेचा लागतील
d) नोकरी व व्यवसायात यश मिळेल

Answer: c) पदोपदी ठेचा लागतील

Teacher's Note:
a) उताऱ्यातील पहिल्या परिच्छेदाचा शेवटचा भाग नीट वाचावा.
b) 'संगत जमली नाही तर' या शब्दांनंतरचे वाक्य थेट उत्तर देते.

 

II] कोणत्या क्षेत्रासाठी कुठल्याही विषयातील पदवी चालते? [1 Mark]
a) वैद्यकीय
b) अभियांत्रिकी
c) सरकारी यंत्रणा व पोलीस
d) वैज्ञानिक

Answer: c) सरकारी यंत्रणा व पोलीस

Teacher's Note:
a) उताऱ्यात 'शिक्षण, प्रसारमाध्यमे आणि प्रशासन' असा स्पष्ट उल्लेख आहे.
b) प्रशासन म्हणजे सरकारी यंत्रणा व पोलीस हे लक्षात ठेवावे.

 

III] 'पारंगत' या शब्दाचा समानार्थी शब्द आहे ... [1 Mark]
a) परंपरा
b) निष्णात
c) अभ्यास
d) पदवी

Answer: b) निष्णात

Teacher's Note:
a) 'पारंगत' म्हणजे एखाद्या विषयात निपुण किंवा तज्ज्ञ झालेला.
b) पर्यायातील शब्दांचे अर्थ नीट पडताळून पाहावेत.

 

प्रश्न 1.B) पुढील प्रश्नांची 15 / 20 शब्दांत उत्तरे लिहा. [4 Marks]

 

I] अभ्यासाची कोणकोणती क्षेत्रे लेखकाने सुचवलेली आहेत? [2 Marks]

Answer: लेखकाने शिक्षण, प्रसारमाध्यमे, प्रशासन (सरकारी यंत्रणा, पोलीस) आणि शास्त्र-तंत्रज्ञान ही क्षेत्रे सुचवली आहेत, जिथे स्वतंत्र वृत्ती व सामाजिक जाणिवेला वाव मिळतो.

Teacher's Note:
a) उताऱ्यातील चौथ्या परिच्छेदातील क्षेत्रांची यादी लक्षात घ्यावी.
b) उत्तर दिलेल्या शब्दमर्यादेत बसवावे.

 

II] अभ्यासक्रम निवडीच्या गोंधळाच्या चक्रातून सुटण्यासाठी लेखकाने कोणता मार्ग सांगितला? [2 Marks]

Answer: जीवनाकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टिकोन ठेवून, आवडीचा विषय शोधून काढणे आणि तोच अभ्यासासाठी निवडणे, हा मार्ग लेखकाने सांगितला आहे.

Teacher's Note:
a) 'सकारात्मक दृष्टिकोन' हा मुख्य कीवर्ड लक्षात ठेवावा.
b) उत्तर स्वतःच्या सोप्या शब्दांत लिहावे.

 

प्रश्न 1.C) पुढील प्रश्नाचे उत्तर सुमारे 40 / 45 शब्दांत लिहा. [3 Marks]

 

I] विद्याशाखा निवडताना होणारा गोंधळ लेखकाने कसा मांडला आहे? [3 Marks]

Answer:
1. स्वतःच्या क्षमतांचा दहावी-बारावीत नीट अंदाज येत नाही.
2. सभोवतालचे अभ्यासाचे वातावरण, दडपण, परीक्षेचा ठरावीकपणा आणि क्लासेसमधून मिळालेले प्रशिक्षण यांचाच कामगिरीत मोठा वाटा असतो.
3. त्यामुळे यश टिकवणे अवघड जाते आणि त्यातून न्यूनगंड, निराशा व समाजाबद्दल चीड निर्माण होते, असा गोंधळ लेखकाने मांडला आहे.

Teacher's Note:
a) तीनही मुद्दे क्रमाने मांडावेत.
b) परीक्षेतील मार्क व प्रत्यक्ष क्षमता यातील फरक हा मुख्य मुद्दा आहे.

 

प्रश्न 2 : खालील कविता वाचून त्याखाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दांत लिहा. (CBQ)

बाळ, चाललास रणा
घरा बांधिते तोरण
पंचप्राणांच्या ज्योतींनी
तुज करिते औक्षण.
याच विक्रमी बाहूंनी
स्वतंत्रता राखायची,
खांद्यावरी या विसावे
शांती उद्याच्या जगाची.
म्हणूनिया माझ्या डोळा
नाही थेंबही दु:खाचा;
मीही महाराष्ट्रकन्या
धर्म जाणते वीराचा.
नाही एकही हुंदका
मुखावाटे काढणार.
मीच लावुनि ठेवली
तुझ्या तलवारीला धार.
अशुभाची सावलीही
नाही पडणार येथे;
अरे मीही सांगते ना
जिजा-लक्ष्मीशी नाते.
तुझ्या शस्त्रांना, अस्त्रांना
शक्ती देईल भवानी,
शिवरायांचे स्वरूप
आठवावे रणांगणी.
धन्य करी माझी कूस
येई विजयी होऊन,
पुन्हा माझिया हाताने
दूधभात भरवीन!
- पद्मा गोळे

 

प्रश्न 2.A) खालील प्रश्नांची उत्तरे दिलेल्या पर्यायांमधून निवडून लिहा. [2 Marks]

 

I] आई बाळाचे कशाने औक्षण करते? [1 Mark]
a) दिव्यांनी
b) पंचप्राणांच्या ज्योतींनी
c) सोन्या-चांदींनी
d) फुलांच्या ताटाने

Answer: b) पंचप्राणांच्या ज्योतींनी

Teacher's Note:
a) कवितेच्या पहिल्या कडव्यातच हे उत्तर आहे.
b) 'औक्षण' म्हणजे ओवाळणे हे लक्षात ठेवावे.

 

II] महाराष्ट्रकन्या कोणाचा धर्म जाणते? [1 Mark]
a) वीराचा
b) मानवतेचा
c) शौर्याचा
d) महाराष्ट्राचा

Answer: a) वीराचा

Teacher's Note:
a) 'मीही महाराष्ट्रकन्या, धर्म जाणते वीराचा' या ओळीत उत्तर स्पष्ट आहे.
b) कडवे लक्षपूर्वक वाचल्यास गोंधळ होणार नाही.

 

प्रश्न 2.B) खालील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा. [3 Marks]

 

I] रणांगणी कोणाचे रूप आठवावे? [1 Mark]

Answer: रणांगणी शिवरायांचे स्वरूप आठवावे.

Teacher's Note:
a) 'शिवरायांचे स्वरूप आठवावे रणांगणी' या ओळीतून उत्तर मिळते.
b) उत्तर पूर्ण वाक्यात लिहावे.

 

II] आई आपले नाते कोणाशी सांगते? [1 Mark]

Answer: आई आपले नाते जिजाबाई आणि राणी लक्ष्मीबाईशी सांगते.

Teacher's Note:
a) 'जिजा-लक्ष्मीशी नाते' या ओळीतून उत्तर मिळते.
b) दोन्ही नावे उत्तरात लिहिणे आवश्यक आहे.

 

III] बाळाच्या तलवारीला कोणी धार लावून ठेवली आहे? [1 Mark]

Answer: बाळाच्या तलवारीला स्वतः आईने धार लावून ठेवली आहे.

Teacher's Note:
a) 'मीच लावुनि ठेवली तुझ्या तलवारीला धार' या ओळीतून उत्तर मिळते.
b) 'मी' म्हणजे आई हे लक्षात घ्यावे.

 

विभाग ब : लेखन (15) (CBQ)

 

प्रश्न 3. खालीलपैकी कोणत्याही एका विषयावर 300 ते 325 शब्दांत निबंध लिहा. (आवश्यकता वाटल्यास दिलेल्या मुद्द्यांचा आधार घ्यावा.) [10 Marks]
I) पर्यावरण संवर्धन काळाची गरज -
मुद्दे:- (पर्यावरण म्हणजे पृथ्वीवरील जीवनाचा आधार.... प्रदूषण (वायू, जल, ध्वनी, माती) याचे परिणाम...... वृक्षतोड, औद्योगिकीकरण आणि वाहतूक यामुळे वाढलेले प्रदूषण....जैवविविधता, प्राणी व वन्यजीवनावर होणारा परिणाम....स्वच्छता आणि कचरा व्यवस्थापनाचे महत्त्व.....पर्यावरण संवर्धनासाठी उपाय - वृक्षारोपण, सार्वजनिक वाहतूक, प्लास्टिक टाळणे..इ.)
II) शेतकऱ्याचे मनोगत -
मुद्दे :- (माझी ओळख ....मी अन्नदाता....शेती हीच माझी उपजीविका आणि अभिमान.... माझे दैनंदिन श्रम...निसर्गाशी नाते.....निसर्गावरच माझ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह अवलंबून....पिकाशी नाते....अडचणी आणि संघर्ष..... माझ्या मनातील हळहळ..... माझे समाधान.....माझी अपेक्षा इ.)
III) मोबाईल आणि युवक -
मुद्दे:- (मोबाईलचे फायदे - संपर्क साधणे, शिक्षण, माहिती मिळवणे......त्रासदायक परिणाम - व्यसन, झोपेची समस्या, अभ्यासावर परिणाम....सोशल मीडिया आणि मानसिक आरोग्यावर परिणाम..... वेळेचे नियोजन, मर्यादित वापर.....पालक व शिक्षकांची जबाबदारी..... फायदे आणि तोटे समजून संतुलित वापर आवश्यक...इ.)
IV) पुस्तके बोलू लागली तर...
मुद्दे :- (वाचनाचा अनोखा अनुभव...... ज्ञान मिळण्याची नवी पद्धत......चुकांवर तत्काळ मार्गदर्शन......ग्रंथालयात जादुई वातावरण....... पुस्तके आपल्याला शिकवतील, फक्त ज्ञानच नाही तर संस्कारही..... मजा आणि मैत्री......पुस्तकांचे परस्पर संवाद.....पुस्तके न वाचणाऱ्यांवर पुस्तके रागावतील........ तुटलेल्या किंवा हरवलेल्या पुस्तकांचा आक्रोश......वाचन संस्कृतीत क्रांती इ.)

Answer: (विषय I - पर्यावरण संवर्धन काळाची गरज)
पर्यावरण म्हणजे पृथ्वीवरील समस्त सजीवसृष्टीच्या जीवनाचा आधार आहे. हवा, पाणी, माती, वनस्पती आणि प्राणी यांच्या परस्परसंबंधातून निसर्गाचे संतुलन राखले जाते. परंतु आजच्या औद्योगिक व यांत्रिक युगात मानवाने स्वतःच्या स्वार्थासाठी या संतुलनाला मोठा धोका निर्माण केला आहे.
वायू प्रदूषण, जलप्रदूषण, ध्वनिप्रदूषण आणि मृदाप्रदूषण यांमुळे मानवी आरोग्यावर तसेच संपूर्ण परिसंस्थेवर गंभीर परिणाम होत आहेत. कारखान्यांतून बाहेर पडणारा धूर आणि वाहनांचा धूर यामुळे हवा दूषित होते. औद्योगिक सांडपाणी नद्या व समुद्रात सोडल्यामुळे जलचरांचे जीवन धोक्यात आले आहे. वृक्षतोड आणि नागरीकरणामुळे जंगले नष्ट होत असून जैवविविधतेला मोठा फटका बसत आहे.
औद्योगिकीकरण आणि वाढती वाहतूक यामुळे प्रदूषणाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे हवामान बदलासारख्या गंभीर समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे स्वच्छता राखणे आणि कचरा व्यवस्थापन करणे ही आजच्या काळाची अत्यंत निकडीची गरज बनली आहे.
पर्यावरण संवर्धनासाठी अनेक उपाय आपण करू शकतो. मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करणे, प्रत्येकाने किमान एक झाड लावून त्याचे संगोपन करणे, सार्वजनिक वाहतुकीचा जास्तीत जास्त वापर करणे, प्लास्टिकचा वापर टाळणे आणि पुनर्वापर करता येण्याजोग्या वस्तूंचा वापर वाढवणे हे उपाय प्रभावी ठरू शकतात.
शालेय स्तरावरही विद्यार्थ्यांना पर्यावरणाचे महत्त्व पटवून देणे आवश्यक आहे, जेणेकरून भावी पिढी पर्यावरणस्नेही जीवनशैली अंगीकारेल. आपण सर्वांनी मिळून पर्यावरण रक्षणाची जबाबदारी उचलली, तरच पुढील पिढ्यांसाठी स्वच्छ, सुंदर आणि सुरक्षित पृथ्वी आपण ठेवू शकू. म्हणूनच पर्यावरण संवर्धन ही काळाची खरी गरज आहे.

Teacher's Note:
a) विद्यार्थ्यांनी दिलेल्या चार विषयांपैकी कोणताही एकच विषय निवडून लिहावा.
b) दिलेल्या मुद्द्यांचा क्रमवार वापर करून परिच्छेद पाडावेत.
c) प्रस्तावना, विषयविस्तार व समारोप असे स्पष्ट टप्पे असावेत आणि शब्दमर्यादा पाळावी.

 

प्रश्न 4. खालीलपैकी कोणत्याही एका विषयावर पत्र लिहा. (लिफाफा आवश्यक) [5 Marks]

तुम्ही निखिल/निकिता राजेंद्र माने, साई निवास, पंचवटी, नाशिक, 422004 असून तुमच्या भागात घंटागाडी नियमित येत नसल्याकारणाने महापालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्याकडे तक्रार करणारे पत्र लिहा.

Answer:
निखिल राजेंद्र माने
साई निवास, पंचवटी, नाशिक - 422004
दिनांक : 15 फेब्रुवारी 2026

प्रति,
मा. आरोग्य अधिकारी,
नाशिक महानगरपालिका, नाशिक.

विषय : घंटागाडी नियमित न येण्याबाबत तक्रार.

महोदय,
सविनय निवेदन की, मी पंचवटी भागातील साई निवास येथील रहिवासी आहे. आमच्या भागात घंटागाडी नियमितपणे येत नसल्यामुळे कचऱ्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे. गेल्या काही आठवड्यांपासून घंटागाडी आठवड्यातून एक-दोनदाच येते, त्यामुळे घरोघरचा कचरा साचून राहतो. यामुळे परिसरात दुर्गंधी पसरते आणि डास, माशा यांचा प्रादुर्भाव वाढला आहे. लहान मुले व वृद्ध नागरिकांना आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
तरी आपणास विनंती आहे की, याकडे तातडीने लक्ष देऊन आमच्या भागात घंटागाडी नियमित पाठवण्याची व्यवस्था करावी, जेणेकरून परिसर स्वच्छ राहील आणि नागरिकांचे आरोग्य सुरक्षित राहील.

आपला विश्वासू,
निखिल राजेंद्र माने

Teacher's Note:
a) पत्त्यावरील दिनांक, प्रेषक व प्राप्तकर्त्याचा पत्ता स्पष्ट लिहावा.
b) तक्रारीचे कारण व अपेक्षित उपाय दोन्ही नमूद करावेत.
c) पत्राच्या शेवटी स्वाक्षरी व लिफाफा (पत्ता) आवश्यक आहे.

किंवा

वेदांत /वेदिका देशमुख, उन्नती विद्यालय, कोल्हापूर येथून ग्रंथपाल या नात्याने ग्रंथालयासाठी मराठी कथा, कादंबरी व इतर पुस्तकांची मागणी करणारे पत्र आदर्श बुक स्टोअर्स, पुणे 400011 च्या व्यवस्थापकास लिहा.

Answer:
वेदांत देशमुख
ग्रंथपाल, उन्नती विद्यालय, कोल्हापूर
दिनांक : 15 फेब्रुवारी 2026

प्रति,
मा. व्यवस्थापक,
आदर्श बुक स्टोअर्स, पुणे - 400011.

विषय : ग्रंथालयासाठी मराठी पुस्तकांची मागणी.

महोदय,
आमच्या उन्नती विद्यालयाच्या ग्रंथालयासाठी मराठी कथासंग्रह, कादंबऱ्या व इतर उपयुक्त पुस्तके खरेदी करावयाची आहेत. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड वाढावी यासाठी ग्रंथालयात नवीन व दर्जेदार पुस्तकांची भर घालणे आवश्यक आहे.
तरी आपणास विनंती आहे की, प्रसिद्ध मराठी लेखकांच्या कथासंग्रह व कादंबऱ्यांची यादी तसेच किमतींसह माहिती आम्हाला पाठवावी. शक्य असल्यास शालेय ग्रंथालयांसाठी विशेष सवलतही उपलब्ध करून द्यावी. पुस्तके लवकरात लवकर पाठवल्यास आम्ही अत्यंत आभारी राहू.

आपला विश्वासू,
वेदांत देशमुख
ग्रंथपाल, उन्नती विद्यालय, कोल्हापूर

Teacher's Note:
a) व्यावसायिक पत्रात विषय व मागणीचा तपशील स्पष्ट असावा.
b) पत्त्यातील पिनकोड व नावे अचूक लिहावीत.
c) पत्राच्या शेवटी हुद्दा नमूद करून स्वाक्षरी करावी.

 

विभाग C : व्याकरण (25)

 

प्रश्न 5. सूचनांप्रमाणे उत्तरे लिहा.

 

5.A) पुढील शब्दांपैकी योग्य समानार्थी शब्द ओळखा. (कोणतेही तीन) [3 Marks]

 

I) युद्ध [1 Mark]
a) संग्राम
b) चढाई
c) मनसुबा
d) पारधी

Answer: a) संग्राम

Teacher's Note:
a) समानार्थी शब्द म्हणजे एकाच अर्थाचे शब्द.
b) 'संग्राम' व 'युद्ध' दोन्ही लढाईशी संबंधित आहेत.

 

II) संसार [1 Mark]
a) नंदन
b) भ्रतार
c) भूपती
d) प्रपंच

Answer: d) प्रपंच

Teacher's Note:
a) 'प्रपंच' म्हणजे घरगुती जबाबदाऱ्या असलेला संसार.
b) इतर पर्याय वेगळ्या अर्थाचे शब्द आहेत हे लक्षात ठेवावे.

 

III) किमया [1 Mark]
a) अंधार
b) चमत्कार
c) वसुधा
d) संकट

Answer: b) चमत्कार

Teacher's Note:
a) 'किमया' म्हणजे अद्भुत किंवा चमत्कारिक गोष्ट.
b) शब्दकोशातील अर्थ लक्षात ठेवल्यास गोंधळ होणार नाही.

 

IV) पावसाळा [1 Mark]
a) ऋतू
b) सलील
c) वर्षा
d) वसंत

Answer: c) वर्षा

Teacher's Note:
a) 'वर्षा' हा पावसाळ्याचाच समानार्थी शब्द आहे.
b) 'ऋतू' हा सर्वसाधारण शब्द असल्याने योग्य पर्याय नाही.

 

5.B) योग्य पर्याय निवडून पुढील समास ओळखा. (कोणतेही 2) [4 Marks]

 

I) 'दररोज' या सामासिक शब्दांचा समास आहे [2 Marks]
a) कर्मधारय समास
b) इतरेतर द्वंद्व
c) अव्ययीभाव समास
d) विभक्ती तत्पुरुष समास

Answer: c) अव्ययीभाव समास

Teacher's Note:
a) 'दर' हे अव्यय पहिल्या पदी असल्याने अव्ययीभाव समास ओळखावा.
b) असे शब्द नेहमी अव्ययाने सुरू होतात हे लक्षात ठेवावे.

 

II) खालील वाक्यातील अधोरेखित सामासिक शब्दाचा समास ओळखा?
प्रजा राजाज्ञा पाळत असे. [2 Marks]

a) अव्ययीभाव समास
b) कर्मधारय समास
c) विभक्ती तत्पुरुष समास
d) द्वंद्व समास

Answer: c) विभक्ती तत्पुरुष समास

Teacher's Note:
a) 'राजाज्ञा' म्हणजे राजाची आज्ञा, यात विभक्ती प्रत्यय लुप्त आहे.
b) विभक्ती तत्पुरुष समासात दोन पदांमधील विभक्ती अध्याहृत असते.

 

III) 'आईवडील' या सामासिक शब्दांचा समास आहे. [2 Marks]
a) कर्मधारय समास
b) अव्ययीभाव समास
c) विभक्ती तत्पुरुष समास
d) द्वंद्व समास

Answer: d) द्वंद्व समास

Teacher's Note:
a) दोन्ही पदे समान दर्जाची असून 'व' हा अर्थ अध्याहृत आहे.
b) असे शब्द दोन स्वतंत्र नामांचे जोडशब्द असतात.

 

IV) 'पुरुषोत्तम' या सामासिक शब्दांचा समास आहे. [2 Marks]
a) कर्मधारय समास
b) इतरेतर द्वंद्व
c) अव्ययीभाव समास
d) विभक्ती तत्पुरुष समास

Answer: a) कर्मधारय समास

Teacher's Note:
a) 'पुरुषोत्तम' म्हणजे पुरुषांत उत्तम, यात विशेषण-विशेष्य संबंध आहे.
b) कर्मधारय समासात दोन्ही पदे एकाच विभक्तीत असतात.

 

5.C) पुढील वाक्यांचा सूचनेनुसार प्रयोग ओळखा किंवा बदला. (कोणतेही 3) [6 Marks]

 

I) 'मुलींच्या संघाने विश्वचषक स्पर्धा जिंकली'. ..... या वाक्याचा प्रयोग आहे. [2 Marks]
a) कर्तरी प्रयोग
b) भावकर्तरी
c) भावे प्रयोग
d) कर्मणी प्रयोग

Answer: d) कर्मणी प्रयोग

Teacher's Note:
a) क्रियापदाचे रूप कर्माच्या लिंग-वचनाप्रमाणे बदलते हे तपासावे.
b) कर्त्याला 'ने' प्रत्यय असूनही क्रियापद कर्माप्रमाणे चालते.

 

II) 'शिकाऱ्याने हरीण पकडले'. (भावे प्रयोग करा) [2 Marks]

Answer: शिकाऱ्याने हरिणाला पकडले.

Teacher's Note:
a) भावे प्रयोगात क्रियापद नेहमी तृतीयपुरुषी नपुंसकलिंगी एकवचनी असते.
b) कर्माला 'ला' प्रत्यय लावावा लागतो.

 

III) 'मी शाळेतून आत्ताच घरी आलो'. या वाक्याचा प्रयोग आहे. [2 Marks]
a) कर्तरी प्रयोग
b) भावकर्तरी
c) भावेप्रयोग
d) कर्मणी प्रयोग

Answer: a) कर्तरी प्रयोग

Teacher's Note:
a) क्रियापदाचे रूप कर्त्याच्या लिंग-वचनाप्रमाणे बदलते.
b) कर्ता प्रथमपुरुषी असल्याने क्रियापदही तसेच बदलते.

 

IV) आईने मुलांना शिस्त लावली. (कर्तरी प्रयोग करा) [2 Marks]

Answer: आई मुलांना शिस्त लावते.

Teacher's Note:
a) कर्तरी प्रयोगात कर्त्याला 'ने' प्रत्यय लागत नाही.
b) क्रियापद कर्त्याच्या लिंग-वचनाप्रमाणे बदलते.

 

5.D) वाक्य प्रकार ओळखा किंवा सूचनेनुसार वाक्य प्रकार बदला. (कोणतेही 3) [6 Marks]
पुढील वाक्याचा प्रकार ओळखा.

 

I) सर्वांनी चांगला अभ्यास करा. [2 Marks]

Answer: आज्ञार्थी वाक्य.

Teacher's Note:
a) वाक्यात आज्ञा किंवा आदेश व्यक्त होतो.
b) क्रियापदाचे रूप आज्ञार्थी असते.

 

II) नदीजवळ एक झाड होते. [2 Marks]

Answer: विधानार्थी वाक्य.

Teacher's Note:
a) वाक्यात केवळ विधान किंवा माहिती सांगितली आहे.
b) कोणताही प्रश्न, आज्ञा किंवा उद्गार नसतो.

 

III) अरे वा! किती सुंदर देखावा आहे. या वाक्याचे विधानार्थी वाक्य आहे. [2 Marks]
a) व्वा! फारच सुंदर देखावा आहे.
b) देखावा काय कमी सुंदर नाही ना?
c) व्वा! खूपच सुंदर देखावा आहे.
d) देखावा फारच सुंदर आहे.

Answer: d) देखावा फारच सुंदर आहे.

Teacher's Note:
a) उद्गारार्थी वाक्याचे विधानार्थी रूप करताना उद्गारवाचक शब्द वगळावा.
b) फक्त साधे विधान उरेल असे वाक्य निवडावे.

 

IV) बलसंवर्धनासाठी भरपूर व्यायाम करावा. या वाक्याचे आज्ञार्थी वाक्य आहे. [2 Marks]
a) बलसंवर्धनासाठी भरपूर व्यायाम करा.
b) बलसंवर्धनासाठी भरपूर व्यायाम करू.
c) बलसंवर्धनासाठी भरपूर व्यायाम करावा का.
d) बलसंवर्धनासाठी भरपूर व्यायाम केला पाहिजे.

Answer: a) बलसंवर्धनासाठी भरपूर व्यायाम करा.

Teacher's Note:
a) आज्ञार्थी वाक्यात आज्ञा किंवा सूचना असते.
b) क्रियापदाचे रूप 'करा' असे आज्ञार्थी असावे.

 

5.E) पुढे काही वाक्ये दिली आहेत. त्या वाक्यात कंसात दिलेल्या वाक्प्रचारांपैकी योग्य त्या वाक्प्रचाराचा वापर करून वाक्य पुन्हा लिहा. (कोणतेही 3) (CBQ) [6 Marks]
(मर्दुमकी गाजवणे, विश्वासघात करणे, पारखे होणे, विसर्ग देणे, शंख करणे)

 

I) शेतात लपलेल्या बिबट्याला पाहून गावकऱ्यांनी आरडाओरडा केला. [2 Marks]

Answer: शेतात लपलेल्या बिबट्याला पाहून गावकऱ्यांनी शंख केला.

Teacher's Note:
a) 'शंख करणे' म्हणजे मोठ्याने ओरडणे किंवा गोंधळ करणे.
b) वाक्प्रचार वापरताना क्रियापदाचे रूप वाक्याला साजेसे ठेवावे.

 

II) शहरात राहणाऱ्या सुभाषची आजी गावाकडे राहत असल्याने सुभाष आजीच्या प्रेमाला दुरावला. [2 Marks]

Answer: शहरात राहणाऱ्या सुभाषची आजी गावाकडे राहत असल्याने सुभाष आजीच्या प्रेमाला पारखा झाला.

Teacher's Note:
a) 'पारखे होणे' म्हणजे एखाद्या गोष्टीपासून दूर राहणे किंवा वंचित होणे.
b) मूळ वाक्यातील अर्थ न बदलता वाक्प्रचार बसवावा.

 

III) मोहनने राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत खूप मोठा पराक्रम केला. [2 Marks]

Answer: मोहनने राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत मर्दुमकी गाजवली.

Teacher's Note:
a) 'मर्दुमकी गाजवणे' म्हणजे शौर्य किंवा पराक्रम दाखवणे.
b) वाक्यातील 'पराक्रम केला' या शब्दांऐवजी वाक्प्रचार वापरावा.

 

IV) स्नेहलने आईशी खोटे बोलून तिचा गळा कापला. [2 Marks]

Answer: स्नेहलने आईशी खोटे बोलून तिचा विश्वासघात केला.

Teacher's Note:
a) 'विश्वासघात करणे' म्हणजे विश्वास ठेवणाऱ्याला फसवणे.
b) वाक्प्रचाराचा अर्थ मूळ वाक्याशी जुळतो का हे तपासावे.

 

विभाग : D : गद्य - पद्य पाठ आणि उपयोजित लेखन (25)

 

प्रश्न 6. गद्य पाठांद्वारे पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा.

 

6.A) योग्य पर्याय निवडून उत्तरे लिहा. [कोणतेही 2] [2 Marks]

 

I) खरा आनंद, टिकाऊ आनंद हा ---------------------- . [1 Mark]
a) अंतरंगातून येतो.
b) बाह्यरंगातून येतो.
c) मध्यरंगातून येतो.
d) उच्चरंगातून येतो.

Answer: a) अंतरंगातून येतो.

Teacher's Note:
a) खरा आनंद बाह्य गोष्टींवर अवलंबून नसतो हे लक्षात ठेवावे.
b) पाठातील मूळ वाक्य आठवून उत्तर द्यावे.

 

II) चाफ्यांजवळ जावं तर त्यांच्या फुलांचा एक वेगळाच मंद मंद गंध येत असतो; पण तो ----------------- मात्र नसतो. [1 Mark]
a) गुलाबासारखा
b) चाफ्यासारखा
c) मोगऱ्यासारखा
d) निशिगंधासारखा

Answer: d) निशिगंधासारखा

Teacher's Note:
a) पाठातील फुलांच्या गंधाच्या तुलनेवरील वाक्य आठवावे.
b) प्रत्येक फुलाचा गंध वेगळा असतो हे नमूद केले आहे.

 

III) कार्यक्रमाची वेळ झाली म्हणून ------------------------ . [1 Mark]
a) भोंगा सांगत नव्हता.
b) भोंगा सांगत व्हता.
c) भोंगा गजबजत व्हता.
d) भोंगा ओरडत व्हता.

Answer: b) भोंगा सांगत व्हता.

Teacher's Note:
a) पाठातील बोलीभाषेतील वाक्य जसेच्या तसे लक्षात ठेवावे.
b) 'व्हता' हे ग्रामीण बोलीतील रूप आहे.

 

6.B) पुढीलपैकी कोणत्याही दोन प्रश्नांची प्रत्येकी सुमारे 35/40 शब्दांत उत्तरे लिहा. [4 Marks]

 

I) गुरुजींचा मुलगा वारल्यानंतर बोर्डिंगातल्या इतर मुलांच्या मनस्थितीत काय परिवर्तन घडून आले? [2 Marks]

Answer: गुरुजींचा मुलगा आजारी असल्याने त्याला डॉक्टरकडे नेले होते, पण तो वारला. त्यानंतर बोर्डिंग भकास वाटू लागले, तेथील चैतन्यच नष्ट झाले आणि मुलांची जेवणावरची इच्छा उडाली. मुले भेदरून गेली आणि सर्वत्र असहायतेचे वातावरण पसरले.

Teacher's Note:
a) 'चैतन्य नष्ट होणे' हा कीवर्ड परीक्षकांना अपेक्षित आहे.
b) मुलांच्या भावनिक अवस्थेचे वर्णन उत्तरात असावे.

 

II) मनाची कवाडं या शब्दसमूहाचा तुम्हांला समजलेला अर्थ लिहा. [2 Marks]

Answer: 'मनाची कवाडं' म्हणजे मनाची दारे. घरातले विश्व चार भिंतींच्या आत, संकुचित असते, तर बाहेरचे जग अफाट असते. मनाची दारे उघडली, तरच मन मोकळे होऊन व्यापक जगात प्रवेश मिळतो.

Teacher's Note:
a) 'कवाडं' म्हणजे दारे हा शब्दशः अर्थ आधी स्पष्ट करावा.
b) संकुचित व व्यापक जगाचा फरक उत्तरात यावा.

 

III) गालावरती वाहणाऱ्या अश्रूंच्या माळा एका क्षणात हिरेजडित झाल्या, या वाक्याचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा. [2 Marks]

Answer: लडाखच्या दऱ्याखोऱ्यात मिट्ट काळोखी रात्री पावसामुळे खल्सेचा पूल कोसळला, हा काळजाचे पाणी करणारा प्रसंग होता. कर्नल राणा यांचा आशादायक, दिलासादायक स्वर ऐकल्यावर डोळ्यांतून कृतज्ञतेचे व आनंदाचे अश्रू वाहू लागले, तेच अश्रू हिरेजडित वाटले.

Teacher's Note:
a) 'हिरेजडित' हा शब्द आनंद व कृतज्ञतेचे प्रतीक आहे हे स्पष्ट करावे.
b) प्रसंगाचा संदर्भ दिल्यास उत्तर अधिक परिपूर्ण होते.

 

IV) संत तुकाराम महाराज यांनी वृक्षवल्लींना 'सोयरी' असे म्हटले आहे, याची तुम्हांला उमगलेली कारणे लिहा. [2 Marks]

Answer: शहरातील आखीव-रेखीव रस्ते व इमारतींपेक्षा रानावनात सौंदर्याची मुक्त उधळण असते. निसर्गात हजारो आकार, रंग, आवाज व गंध यांमुळे पंचेंद्रियांच्या सुखाची लयलूट होते. तुकाराम महाराजांनी विठ्ठलभक्तीसाठी वनाचाच आश्रय घेतला व ईश्वराचे निर्मळ रूप वृक्षांत पाहिले, म्हणून त्यांनी वृक्षवल्लींना 'सोयरी' म्हटले.

Teacher's Note:
a) 'सोयरी' म्हणजे जवळचे नाते हा अर्थ स्पष्ट करावा.
b) निसर्ग व भक्ती यांचा संबंध उत्तरात दाखवावा.

 

6.C) पुढीलपैकी कोणत्याही दोन प्रश्नांची प्रत्येकी सुमारे 70 / 75 शब्दांत उत्तरे लिहा. [6 Marks]

 

I) अक्राळविक्राळ राक्षसाशी लेखकाने दुखऱ्या दाताची तुलना केलेली आहे, याबाबत स्वमत लिहा. [3 Marks]

Answer:
1. दातदुखीच्या वेदना इतक्या तीव्र असतात की माणूस असह्य होऊन बोंबा मारू लागतो.
2. जखम झाली तर मलमपट्टी करता येते, पण दातदुखी व दाढदुखीचे ठणके जीवघेणे असतात, त्यामुळे लेखकाने त्याची तुलना अवाढव्य राक्षसाशी व डोक्यात घणाचे घाव बसण्याशी केली आहे.
3. या वेदना दुसरा कोणी सहन करू शकत नाही, ज्याला त्या होतात त्यालाच त्या भोगाव्या लागतात, हे या तुलनेतून स्पष्ट होते.

Teacher's Note:
a) उपमेमागील कारण स्पष्ट करणे हा मुख्य मुद्दा आहे.
b) 'राक्षस' व 'घण' या प्रतिमा उत्तरात याव्यात.

 

II) ब्रिगेडियर ठाकूर यांनी शहरातील कुशाग्र बुद्धीच्या मुलांना मार्गदर्शन करण्याची विनंती लेखिकेला का केली असावी? [3 Marks]

Answer:
1. सेनादलांविषयी शहरी लोकांमध्ये अनेक गैरसमज आहेत; परकीयांच्या आक्रमणाबद्दल प्रेम व अभिमान असूनही सेनादलातील जीवन कष्टाचे वाटते.
2. सेनादलातील नोकरीबाबतचे गैरसमज, लष्करातील थरारक अनुभव, नोकरीची सोय व मूल्यवान प्रशिक्षण याबाबत मुलांना कोणीतरी जिव्हाळ्याने समजावून सांगणे गरजेचे होते.
3. म्हणून कुशाग्र बुद्धीच्या मुलांनी सेनादलाकडे वळावे यासाठी ब्रिगेडियर ठाकूर यांनी लेखिकेला मार्गदर्शन करण्याची विनंती केली असावी.

Teacher's Note:
a) गैरसमज दूर करण्याचा उद्देश हा मुख्य मुद्दा आहे.
b) लेखिकेच्या जिव्हाळ्याच्या भूमिकेचा उल्लेख करावा.

 

III) आपण जे काम करत आहोत, जे काम करायचंच आहे, त्यात आनंद घ्यायला शिकणं हेही शक्य असतं, या विधानाबाबत सविस्तर स्वमत लिहा. [3 Marks]

Answer:
1. अनेकदा शिक्षण किंवा नोकरी-व्यवसायाची निवड करताना आपण आवडीच्या विषयाऐवजी आईवडिलांच्या आग्रहाला बळी पडतो.
2. यामुळे पुढे काम करताना असमाधान निर्माण होते, म्हणून निर्णय घेताना विचारपूर्वक निवड करणे आवश्यक आहे.
3. जे काम आपल्या वाट्याला येते त्यात आपली सर्व कौशल्ये पणाला लावली, तर काम आपोआप सुंदर होते आणि त्यातून आनंद व प्रतिष्ठा दोन्ही मिळतात.

Teacher's Note:
a) स्वतःच्या अनुभवाचे उदाहरण दिल्यास उत्तर परिणामकारक होते.
b) 'कौशल्ये पणाला लावणे' हा मुख्य कीवर्ड लक्षात ठेवावा.

 

प्रश्न 7. A) पद्य पाठांच्या आधारे योग्य पर्याय निवडून पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. [कोणतेही 2] [2 Marks]

 

I) शेतातील हिरवीगार पिके म्हणजेच ---- [1 Mark]
a) कोमल पाचूंची शेते
b) कोमल नीलकमलांची शेते
c) कोमल रत्नांची शेते
d) कोमल वालुकांची शेते

Answer: a) कोमल पाचूंची शेते

Teacher's Note:
a) हिरव्या रंगाची तुलना पाचूशी केली आहे हे लक्षात ठेवावे.
b) कवितेतील रूपकात्मक शब्दयोजना समजून घ्यावी.

 

II) कवी सुरेश भट यांना -------------- लळा लागला आहे. [1 Mark]
a) सुखाचा
b) प्रेमाचा
c) दु:खाचा
d) आनंदाचा

Answer: c) दु:खाचा

Teacher's Note:
a) गझलमधील दुःखाच्या भावनेचा उल्लेख लक्षात ठेवावा.
b) कवीचे बेधडक व्यक्तिमत्त्व याच भावनेतून व्यक्त होते.

 

III) सत्त्व उतारा देऊन, म्हणजे ……. [1 Mark]
a) जीवनसत्त्व देऊन
b) सत्त्वगुणांचा आश्रय घेऊन
c) सात्त्विक आहार देऊन
d) सत्त्वाचे महत्त्व सांगून

Answer: b) सत्त्वगुणांचा आश्रय घेऊन

Teacher's Note:
a) 'सत्त्व उतारा देणे' या शब्दप्रयोगाचा भावार्थ समजून घ्यावा.
b) भारुडातील रूपकात्मक अर्थ लक्षात ठेवावा.

 

7. B) कोणत्याही दोन प्रश्नांची सुमारे 35/40 शब्दांत उत्तर लिहा. [4 Marks]

 

I) 'आरशाबाहेरील स्त्रीशी आरशातील स्त्रीने केलेला संवाद हा स्वत:शीच केलेला सार्थ संवाद आहे', हे विधान स्पष्ट करा. [2 Marks]

Answer: संसारात गढून गेलेल्या स्त्रीच्या अंतर्मनात गतस्मृतींची जाणीव होते. आरशाबाहेरील स्त्री पूर्वीची अल्लड, चैतन्यमय नवतरुणी होती, तर आरशातील स्त्री तिला धीर देऊन आत्मविश्वास जागवते. हा स्वतःशीच केलेला मुक्त व सार्थ संवाद आहे.

Teacher's Note:
a) दोन्ही स्त्रिया एकाच व्यक्तीच्या भूत-वर्तमान रूपांचे प्रतीक आहेत हे स्पष्ट करावे.
b) 'सार्थ संवाद' या शब्दाचा अर्थ उत्तरात यावा.

 

II) कवीच्या आयुष्याने त्यांची फसवणूक केलेली आहे, हे तुम्ही तुमच्या शब्दांत स्पष्ट करून लिहा. [2 Marks]

Answer: गझल लिहिणाऱ्या कवीचे व्यक्तिमत्त्व बेधडक असून त्याला दुःखाचा लळा व सुखाच्या झळा दोन्ही सोसाव्या लागल्या आहेत. वस्तुस्थिती विपरीत दाखवणाऱ्या फसव्या लोकांमुळे बेसावध क्षणी आयुष्याने कवीचा विश्वासघात केला, तरी कवी त्या फसवणुकीला पुरून उरला.

Teacher's Note:
a) 'फसवणूक' व 'पुरून उरणे' हे दोन्ही कीवर्ड उत्तरात यावेत.
b) कवीच्या धीट स्वभावाचा उल्लेख करावा.

 

III) शेतकरी स्त्रियांच्या कष्टमय जीवनाचे वर्णन कवितेच्या आधारे लिहा. [2 Marks]

Answer: 'रोज मातीत' या कवितेत कवयित्रीने शेतकरी स्त्रियांच्या कष्टमय जीवनाचे हृदयद्रावक चित्रण केले आहे. काड्या-काड्या जमवून ती संसार सांधते, उन्हातान्हात राबते आणि सुगीचे स्वप्न उराशी बाळगून पाणी शेंदते. तिचे हिरवेगार स्वप्न सतत मातीतच नांदत असते.

Teacher's Note:
a) 'मातीतच नांदणारे स्वप्न' हा भावार्थ स्पष्ट करावा.
b) शेतकरी स्त्रीच्या कष्टाचे शब्दचित्र उत्तरात असावे.

 

7. C) पुढीलपैकी एका काव्यपंक्तीचा भावार्थ सुमारे 70/75 शब्दांत लिहा. (CBQ) [4 Marks]

आश्लेषांच्या तुषारस्नानी । भिजून पिसोळी थव्याथव्यांनी ॥
रत्नकळा उधळित मध्यान्ही । न्हाणोत इंद्रवणांत वना ॥

Answer:
1. कवी बा. भ. बोरकर यांच्या 'ये थांब जरा आषाढघना' या कवितेतील या ओळी आहेत.
2. आषाढ महिन्यात धरतीवर पडणाऱ्या पावसामुळे निसर्गसृष्टीत सौंदर्यमय बदल झालेले दिसतात.
3. आश्लेषा नक्षत्रातील पावसाच्या शिडकाव्याने भिजलेली फुलपाखरे थव्याथव्यांनी शिरशिरत उडत आहेत आणि भर दुपारी आपल्या रत्नासारख्या रंगीबेरंगी पंखांची कळा उधळत रानावनात न्हाऊन निघत आहेत.
4. या ओळींतून पावसाळ्यातील निसर्गाच्या नितांतसुंदर व टवटवीत रूपाचे कवीने प्रत्ययकारी वर्णन केले आहे.

Teacher's Note:
a) कवितेचे नाव व कवीचे नाव उत्तराच्या सुरुवातीला द्यावे.
b) निसर्गचित्रणाचे सौंदर्य उत्तरात अधोरेखित करावे.

किंवा

मनुष्य इंगळी अति दारुण । मज नांगा मारिला तिने ।
सर्वांगी वेदना जाण । त्या इंगळीची ॥

Answer:
1. संत एकनाथ महाराजांच्या 'विंचू चावला' या भारुडातील या ओळी आहेत.
2. यात मनुष्य स्वभावातील काम-क्रोधरूपी विंचवाला अत्यंत दारुण व भयंकर विंचू म्हटले आहे.
3. या विंचवाने डंख मारल्यामुळे संपूर्ण शरीरात असह्य वेदना, दुर्गुणांचा घाम आणि जीव व्याकूळ होऊन प्राणांतिक यातना होतात.
4. सत्संगाच्या साह्याने या काम-क्रोधरूपी विंचवाचा दाह शमवावा, अशी शिकवण या भारुडातून दिली आहे.

Teacher's Note:
a) भारुडाचे नाव व संतांचे नाव उत्तराच्या सुरुवातीला द्यावे.
b) 'विंचू' हे काम-क्रोधाचे प्रतीक आहे हे स्पष्ट करावे.

 

प्रश्न 8. पुढील प्रश्नाचे 60/65 शब्दांत उत्तर लिहा. [3 Marks]

व्यक्तीच्या कार्यकर्तृत्वाची ओळख करून घेण्यासाठी मुलाखत हे उत्तम साधन आहे, स्पष्ट करा.

Answer:
1. मुलाखतीतून एखाद्या व्यक्तीची ओळख, तिचे कार्य आणि यशाच्या शिखरावर जाण्यासाठी भोगाव्या लागलेल्या यातना, संघर्ष व जिद्द समजते.
2. 'जया अंगी मोठेपण, तया यातना कठीण' या उक्तीप्रमाणे मुलाखतीतून खडतर जीवनप्रवास उलगडतो.
3. जगावेगळी आव्हाने पेलून स्वतःच्या कर्तृत्वाने स्वतःला सिद्ध केलेल्या व्यक्ती मुलाखतीतून समोर येतात, त्यामुळे मुलाखत हे कार्यकर्तृत्व ओळखण्याचे उत्तम साधन आहे.

Teacher's Note:
a) मुलाखतीचा उद्देश व महत्त्व दोन्ही उत्तरात यावे.
b) संबंधित उक्ती उद्धृत केल्यास उत्तर अधिक परिणामकारक होते.

किंवा

माहितीपत्रकाची गरज असणारी क्षेत्रे लिहून, माहितीपत्रक म्हणजे अप्रत्यक्षपणे जाहिरातच हे कसे सिद्ध करता येईल ते लिहा.

Answer:
1. आजच्या स्पर्धेच्या युगात शैक्षणिक संस्था, कारखाने, नाट्यगृहे, सिनेमागृहे, बँका, बचतगट तसेच औषधे, विद्युत उपकरणे, वाहने यांची निर्मिती करणारे उद्योग यांना माहितीपत्रकाची गरज असते.
2. माहितीपत्रकातून वैशिष्ट्यपूर्ण माहिती देणारे पत्रक कमी खर्चात व कमी वेळेत अधिकाधिक ग्राहकांपर्यंत पोहोचवता येते.
3. अशा प्रकारे उत्पादन किंवा सेवेची माहिती आकर्षक पद्धतीने ग्राहकांपर्यंत पोहोचवली जात असल्याने माहितीपत्रक हे अप्रत्यक्षपणे जाहिरातच ठरते.

Teacher's Note:
a) माहितीपत्रकाची गरज असणारी किमान तीन-चार क्षेत्रे उदाहरणादाखल द्यावीत.
b) 'अप्रत्यक्ष जाहिरात' हा मुख्य मुद्दा स्पष्टपणे मांडावा.

 

8. पुढील प्रश्नाचे 60/65 शब्दांत उत्तर लिहा. [3 Marks]

व्यक्तीच्या कार्यकर्तृत्वाची ओळख करून घेण्यासाठी मुलाखत हे उत्तम साधन आहे, स्पष्ट करा. [3 Marks]

Answer: मुलाखत हे एखाद्या व्यक्तीच्या कार्यकर्तृत्वाची सखोल ओळख करून देणारे प्रभावी साधन आहे. मुलाखतीतून त्या व्यक्तीने यशाच्या शिखरावर पोहोचण्यासाठी सोसलेला संघर्ष, यातना आणि जिद्द समोर येते. 'जया अंगी मोठेपण तया यातना कठीण' या उक्तीप्रमाणे प्रतिकूल परिस्थितीशी झुंज देत स्वतःला सिद्ध केलेल्या व्यक्तीचा खडतर जीवनप्रवास मुलाखतीमुळे वाचकांसमोर उलगडतो.

Teacher's Note:
a) संघर्ष, जिद्द व यातना हे शब्द उत्तरात यायला हवेत.
b) दिलेली म्हण उत्तरात संदर्भासह वापरावी.
c) शब्दमर्यादेचे पालन करावे.

किंवा

माहितीपत्रकाची गरज असणारी क्षेत्रे लिहून, माहितीपत्रक म्हणजे अप्रत्यक्षपणे जाहिरातच हे कसे सिद्ध करता येईल ते लिहा. [3 Marks]

Answer: आजच्या स्पर्धेच्या युगात शैक्षणिक संस्था, कारखाने, नाट्यगृहे, सिनेमागृहे, बँका, बचतगट तसेच औषधे, विद्युत उपकरणे व वाहने निर्माण करणारे उद्योग यांना माहितीपत्रकाची गरज असते. माहितीपत्रकाद्वारे संस्थेची वैशिष्ट्यपूर्ण माहिती परिचयात्मक स्वरूपात दिली जाते, त्यामुळे कमी खर्चात व कमी वेळेत अधिकाधिक ग्राहकांपर्यंत पोहोचणे शक्य होते. म्हणूनच माहितीपत्रक हे अप्रत्यक्षपणे जाहिरातच ठरते.

Teacher's Note:
a) उत्तरात किमान तीन-चार क्षेत्रांचा उल्लेख आवश्यक आहे.
b) 'कमी खर्च, कमी वेळ, अधिक ग्राहक' हा मुद्दा स्पष्ट यायला हवा.
c) निष्कर्ष स्वरूपात शेवटचे वाक्य महत्त्वाचे आहे.

Exam Preparation Sample Paper for Class 12 Marathi CBSE Class 12 Marathi Sample Paper 2026 27 with Solutions PDF Download

Access Sample Papers for Class 12 Marathi

Explore downloadable sample sets for Class 12 Marathi. Utilizing the CBSE Class 12 Marathi Sample Paper 2026 27 with Solutions PDF Download allows learners to gauge exam readiness and master official CBSE assessment structures.

Why Practice Class 12 Marathi Sample Papers?

  • Exam Blueprint: Understand mark allocations and structural guidelines relevant to Class 12 evaluations.
  • Targeted Improvement: Identify weak areas in Class 12 Marathi requiring focused revision.
  • Pacing & Precision: Practice mixed question formats to build execution speed and ensure timely paper completion.

How to Analyze Your Performance in CBSE Class 12 Marathi Sample Paper 2026 27 with Solutions PDF Download

  1. Verify Answers: Compare your responses against professional teacher solutions provided in the sample paper keys.
  2. Error Analysis: Class 12 learners must review incorrect answers carefully to understand underlying mistakes.
  3. Concept Reinforcement: Consult the official NCERT book for Class 12 Marathi when stuck before re-attempting problems.

FAQs

Where can I download the PDF for CBSE Class 12 Marathi Sample Paper 2026 27 with Solutions PDF Download?

You can download the complete PDF for CBSE Class 12 Marathi Sample Paper 2026 27 with Solutions PDF Download for free from StudiesToday.com. Our resources for Class 12 Marathi are updated for the latest academic session and follow the official exam pattern.

Are solutions provided for CBSE Class 12 Marathi Sample Paper 2026 27 with Solutions PDF Download?

Yes, CBSE Class 12 Marathi Sample Paper 2026 27 with Solutions PDF Download comes with detailed, teacher-verified solutions. We have provided step-by-step answers for Marathi to help students of Class 12 understand correct methodology and marking scheme.

How can practicing CBSE Class 12 Marathi Sample Paper 2026 27 with Solutions PDF Download help in exam preparation?

Practicing this Marathi paper helps in time management and identifying important topics. For Class 12, solving mock papers is the best way to gain confidence and reduce exam-day anxiety.

Is the CBSE Class 12 Marathi Sample Paper 2026 27 with Solutions PDF Download accessible on mobile and tablets?

Yes, all our study materials for Class 12 Marathi are provided in a mobile-friendly PDF format. You can easily download CBSE Class 12 Marathi Sample Paper 2026 27 with Solutions PDF Download on your mobile device.